धर्मवीर अध्यात्मिक सेना

नवीनतम घडामोडी

सध्याच्या घडामोडींचा तपशील

महाराणी ताराबाईंच्या समाधीस्थानाला नवसंजीवनी; उप मुख्यमंत्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या डॉ.गौरव घोडेंचे स्तुत्य प्रयत्न महाराणी ताराबाई या मराठा साम्राज्याच्या एक अत्यंत शूर, बुद्धिमान आणि राजकीय दृष्ट्या कुशल असे स्त्री नेतृत्व होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्नुषा आणि राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. छत्रपती श्री राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर, त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध मराठ्यांच्या लढ्याचे नेतृत्व केले. त्या काळात औरंगजेब मराठ्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करत होता, पण ताराबाईंनी अतिशय शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने मराठा सत्ता टिकवून ठेवली. छत्रपती शाहू महाराज कैदेत असताना, त्यांनी आपल्या मुलाला – श्रीशिवाजीमहाराज द्वितीय यांना छत्रपती म्हणून घोषित करून स्वतः राजसत्ता हाती घेतली. त्या अत्यंत करारी, बुद्धिमान व धोरणी होत्या. स्त्रियांनाही उत्तम नेतृत्व देता येते, याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून संबंधित समाधीवरील शिवलिंग पादुका व दीप अत्यंतजीर्ण अवस्थेत होता. उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने सातारा येथील छत्रपती घराण्याच्या मार्गदर्शनाने संगम माहूली ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन विभागाचे प्रमुख डॉ.गौरव घोडे यांनी संपूर्ण समाधीस मागील अनेक महिने कार्य करत नवसंजीवनी प्राप्त करून दिली. महाराणी ताराराणी आईसाहेबांच्या मूळ समाधी स्थान बांधकाम करून त्याची त्या ठिकाणी विधिवत पुनर्स्थापना करण्यात येणार आहे.

सोशल मीडिया

आमच्याबद्दल माहिती

हरिकथा निरुपणाला राजकरणाची कवच कुंडले समर्थांनी बहाल केली व राजकारणाला धर्मकारणाची बैठक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच विचारावर अधिष्ठीत ही भक्ती शक्ती चळवळ म्हणजे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना.

शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून हिंदुत्वाच्या अनुषंगाने विशेष कार्य करण्याकरिता शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे निर्मिती करण्यात आली. संत साहित्य अभ्यास व कीर्तनकार श्री अक्षयमहाराज भोसले यांनी याबाबतची संकल्पना मांडली होती. महाराष्ट्रातील सकल पंथ, संप्रदाय व साधू समाज यांच्यासमोर येणाऱ्या सर्व समस्या जाणून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याकरता या सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम उभे राहिले. कोणत्याही धर्माचा अंधळा अभिमान हा एक शाप आहे. तर त्या धर्माविषयांचे अज्ञान हा एक अपराध आहे. मात्र कितीही धर्म पंथ उदयास आले तरी हिंदू धर्माचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून जन माणसांपर्यंत भक्ती शक्तीच्या अतुल्य संवादातून मा.ना.श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सदर विचार महाराष्ट्रभर पोहचवत श्री अक्षयमहाराज भोसले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यातील ११२ पेक्षा अधिक पंथ व संप्रदायाचे मुख्य धर्मगुरु यात सक्रिय सहभागी झाले.

आम्हाला आपणास कळविण्यास आनंद वाटतो की जवळपास ३००० पेक्षा अधिक साधू व संत, कीर्तनकार, निरूपणकार सक्रिय असणारे हे राजकीय क्षेत्रातील एकमेव संघटन आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती, साहित्य व सांस्कृतिक परंपरेमध्ये योगदान देणारे थोर संतांचे वंशज देखील या सेनेमध्ये सक्रिय होऊन अध्यात्मिक क्षेत्रासाठी मोठे योगदान देत आहेत.

कार्य आणि योजना

प्रमुख भूमिका

Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore

मुख्य कार्यकारिणी

Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore

महत्वाचे संदेश

Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia

योगदान द्या

Voluptatum deleniti atque corrupti quos dolores et quas molestias excepturi

विकास आराखडा

At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus qui blanditiis

ई-ग्रंथालय

Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore

सदस्यता

सदस्य होण्याचे फायदे असे असू शकतात !

  • आपल्याला उद्भवणाऱ्या समस्यांशी सामना करण्यास मदत होते.
  • अध्यात्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय होण्यास अधिक मदत.
  • प्रत्येक समस्येवर हमखास उत्तर व उपाययोजना.

छायाचित्र दालन

नेतृत्व

Animated Card Hover Effect Html & CSS

मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

एकनाथजी संभाजी शिंदे हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत.शिंदे हे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री देखील आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथजी शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.

Animated Card Hover Effect Html & CSS

मा. खा. डॉ श्रीकांतजी एकनाथजी शिंदे

खासदार,कल्याण लोकसभा,युवा शीर्ष नेतृत्व

डॉ. श्रीकांतजी एकनाथजी शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांचा २.५० लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये, भारतात ३५ वर्षांखालील ३२ पहिल्यांदाच खासदार झाले.

Animated Card Hover Effect Html & CSS

ह.भ.प श्री अक्षयमहाराज भोसले

प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

ह.भ.प.श्री अक्षयमहाराज भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावचा. लहानपणीच मातु:श्री धनश्री यांच्याकडून आध्यात्मिक संस्काराचे बाळकडू.

Image

यशोगाथा म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची व शौर्याची गाथा सांगणारा साहित्य प्रकार. यशोगाथा ही एक महत्त्वपूर्ण काव्यशैली आहे, ज्यामध्ये एखाद्या नायकाची जीवनगाथा, त्याच्या धैर्याची व वीरतेची कथा सांगितली जाते. या गाथांमध्ये त्या नायकाने केलेल्या शौर्यपूर्ण कार्यांचा, युद्धातील विजयांचा, त्याच्या महान कार्यांमुळे त्याला मिळालेल्या प्रतिष्ठेचा उल्लेख केला जातो. यशोगाथांमध्ये शौर्य, पराक्रम, स्वातंत्र्यप्रेम, इत्यादी बाबी जास्त प्रमाणात आढळतात. काही प्रसिद्ध यशोगाथा काव्ये किंवा गाथांमध्ये वीर नायकांच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे कार्य, आणि त्या कार्यामुळे मिळालेल्या मानाच्या कथा दिल्या जातात.

महत्त्व:

यशोगाथा आपल्या सांस्कृतिक व ऐतिहासिक धरोहराचे संवर्धन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे. यशोगाथा केवळ ऐतिहासिक घटनांचा दर्जा वाढवत नाही, तर त्या घटनांना लोकांच्या मनात स्थिर स्थान प्राप्त करण्याचे कार्य देखील करते. या गाथांद्वारे आपल्याला प्रेरणा मिळते आणि नायकांच्या कर्तृत्वाची कदर करण्याची प्रेरणा मिळते.