धर्मवीर अध्यात्मिक सेना

नेतृत्व

अक्षय महाराज भोसले

ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावचा . लहानपणीच मातु:श्री धनश्री यांच्याकडून आध्यात्मिक संस्काराचे बाळकडू . शालेय प्राथमिक शिक्षण ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई येथे तर माध्यमिक शिक्षण अनुक्रमे तेरणा महाविद्यालय , कोपरखैराणे व रयत शिक्षण संस्था वाशी गाव येथील विद्यालयात . महाविद्यालयीन शिक्षण हे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ,खारघर येथे . बालवयात मातु:श्री मुळे ब्रह्मलीन सदगुरू बेळगावच्या कृष्णभक्त श्री कलावती देवी यांच्या सत्संगाची आवड . नियमित बलोपासना तथा आदि संत वाड्मयाचे वाचन मनन .शालेय शिक्षण घेतानाच देगलूरकर परंपरेचे निष्ठावंत तथा वै.श्रीधुंडामहाराज देगलूरकर यांचे शिष्य श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या कीर्तनाचा बालमनावर परिणाम . गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण . शास्त्रीय गायन तथा पखवाज वादन यांचे शिक्षण. प.पू.श्रीगुरू ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर, प.पू.श्रीगुरू ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप यांचे पारमार्थिक क्षेत्रात प्रमुख मार्गदर्शन .सदगुरू प.पू. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तन श्रवणाची आवड .सन २०१४ पासून मासिक वैष्णव दर्शन (ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र ) याचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत . इंटरनेटच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व त्यातील संतसाहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्नशील . नियमित पणे वारकरी संप्रदाययुवा मंचच्या ब्लॉग द्वारे लिखाण . वारकरी संप्रदाय संदर्भात अनेक मुलाखती. पंढरपूर वारी दरम्यान दूरदर्शन-सह्याद्री .ऋषी पंचमी निमित्त दूरदर्शन-सह्याद्री वरील मुलाखत वाहिनीवर अनेक मुलाखती. वारी आणि सोशल मिडिया यांवरील झी २४ तास वरील विशेष मुलाखत. वारकरी संप्रदाय व त्यातील कार्याविषयी लोकमत,प्रहार (वृत्तपत्र),सकाळ (वृत्तपत्र),पुढारी (दैनिक) आदींद्वारा लेख तथा कार्याचा गौरव विवध वृत्त प्रसिद्ध.

छायाचित्र दालन

भेट आणि मार्गदर्शन

आपल्या समस्या आणि त्यांचे निवारण अध्यात्मिक मार्गदर्शनाने करण्यासाठी आजच आपली भेटीची वेळ निश्चित करा..